Vijay Wadettiwar | काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना शिवसेनेमध्ये (शिंदे गट) येण्याची ऑफर देण्यात आली आहे. विजय वडेट्टीवार यांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा हे माझं त्यांना सांगणं असल्याचे सामंत म्हणाले. “लंकेची उपमा फक्त रावण होता म्हणून लंका वाईट आहे, असे नाही. कदाचित त्यांनी इतिहास वाचला नसेल. माझा विजय वडट्टेवार यांना सल्ला आहे की, काँग्रेसमध्ये काही शिल्लक राहिलेले नाही. आम्ही सुखाने नांदत आहोत. आम्ही नांदत असताना तुम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घ्या. त्यांना मान-सन्मान आम्ही शिवसेनेत देतो. विदर्भातील ते एक चांगले नेतृत्व आहे, त्यामुळे त्यांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा,” अशी खुली ऑफर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी दिली. वडेट्टीवार यांनाही आशेचा किरण भविष्यात दिसेल या निवडणुकीच्या निमित्ताने एवढ्यासाठीच विनंती करत आहे की, त्याला कारण आहे. माझ्या शेजारी सिद्धराम म्हेत्रे आहेत. जे ६० वर्ष काँग्रेसमध्ये होते. त्यांच्या आधीपासून काँग्रेसमध्ये होते. ज्यावेळेस त्यांना राजकारणापासून अलिप्त व्हावे, असे वाटू लागले, त्यावेळेस त्यांना एकच आशेचा किरण दिसला, ते म्हणजे एकनाथ शिंदे. त्यामुळे वडेट्टीवार यांनाही हा आशेचा किरण भविष्यात दिसेल, अशी खात्री आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. मी कोणाचीही उनी-दूनी काढलेली नाहीत. माझ्या राजकीय जीवनात लोक माझी उनी दुनी काढतात मी कोणाची काढली नाहीत असे सामंत म्हणाले. सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढत सुरू आहे, त्यात थोडेफार मागेपुढे झालं असेल. मात्र निवडणुकीनंतर सर्वकाही व्यवस्थित घडेल सिंधुदुर्गात काही वाद झाले ते गैरसमजातून झाले असावे मात्र ते लवकर दुरुस्त होतील असं सामंत म्हणाले. Vijay Wadettiwar | युती टिकवणे सर्वांची जबाबदारी “रवींद्र चव्हाण म्हणाले की दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. पण आपण म्हणताय तसे फक्त दोन तारखेपर्यंत युती टिकवायची असे ते म्हणाले नाहीत. युती टिकवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे परिपक्व राजकारणी आहेत,” असे मत सामंत यांनी व्यक्त केले. Vijay Wadettiwar | हेही वाचा: पुणेकरांनो, स्वेटर बाहेर काढा! किमान तापमान १३ अंशावर; पुढील दोन दिवस हवामान कसे.. जाणून घ्या