Pune News : गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांवर बंधन नाही
Updated On:

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशा पथकांची संख्या आणि पथकातील सदस्यसंख्या यावर कोणतेही निर्बंध घालण्यात येणार नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे.
या संदर्भात सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जोपर्यंत गणेश मंडळे विसर्जनासाठी ठरवलेल्या वेळेचे काटेकोर पालन करतील, तोपर्यंत पोलिसांकडून ढोल-ताशा पथकांची संख्या व त्यामधील सदस्यसंख्येवर सक्ती केली जाणार नाही,” असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हा संदेश पोलिसांनी व्हॉट्सअॅप गटांवर शेअर करून सर्व मंडळांना कळवण्यात आला आहे. त्यामुळे मिरवणूक व्यवस्थित व ठरलेल्या वेळेत पार पाडणे ही जबाबदारी मंडळांची राहणार आहे.





