मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत ‘या’ तारखेपर्यंत वाढ

Manish Sisodia | दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही. आज सिसोदिया यांना राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही.
आज म्हणजेच 6 जुलै रोजी सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर सीबीआयने त्यांना न्यायालयात हजर केले. त्यानंतर राऊस एव्हेन्यू कोर्टाने सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 15 जुलैपर्यंत वाढ केली. त्यामुळे मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ होत आहे.
सीबीआयच्या अटकेनंतर सिसोदिया 26 फेब्रुवारीपासून कोठडीत आहेत. यापूर्वी 21 मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआय आणि ईडी प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. तर दुसरीकडे, बुधवारी दिल्ली न्यायालयाने मनीष सिसोदिया आणि बीआरएस नेते के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीतही 25 जुलैपर्यंत वाढ केली आहे. Manish Sisodia |
यासोबतच आरोपपत्राच्या प्रती आणि कागदपत्रे दोन दिवसांत आरोपींना देण्याचे निर्देश न्यायालयाने ईडीला दिले होते. यापूर्वी, ईडीने दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 9 वे आरोपपत्र दाखल केले होते.
सिसोदिया यांच्यावर कोणता आरोप आहे ?
दरम्यान, सिसोदिया यांच्यावर दारू घोटाळ्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप होते. त्याचा फायदा परवाना घेणाऱ्यांना झाल्याचे सांगण्यात आले. दारू कंपन्यांना परवाना शुल्कात करोडोंची सूट देण्यात आली. त्यामुळे सरकारी तिजोरीचे नुकसान झाले. त्यांनी अबकारी धोरणाच्या विरोधात निर्णय घेतले. दारू घोटाळ्यातील पुरावे लपवण्यासाठी त्यांनी अनेक सिमकार्ड बदलले असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.
हेही वाचा:
शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीचा 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न





