शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीचा 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

अकोल शहरातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत संतापजनक घटना घडली आहे. शालेय पोषण आहार बनवणाऱ्या एका कर्मचाऱ्याने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेवर स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ जुलै रोजी नेहमी प्रमाणे ९ वर्षीय विद्यार्थिनी शाळेत आली. यावेळी आरोपी चंद्रमणीने पीडित विद्यार्थिनीला खिचडी देण्याचं अमिष दाखलवून एका खोलीत नेलं. विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकारानंतर पीडित विद्यार्थिनी घाबरली आणि ती पुढील तीन ते चार दिवस शाळेत आली नाही. या घटनेनंतर ती इतकी घाबरली होती की तिने आई सुद्धा लगेच काहीच सांगितले नाही. मात्र तीन ते चार दिवसांनंतर लेक शाळेत का जात नाही असा प्रश्न आईला पडला. आणि पीडितेच्या आईने तिला आईने तिला याबाबत विचारणा केली. तेव्हा तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईजवळ कथन केला. हे ऐकल्यानंतर आईच्या पायाखालील जमीन सटकली.
दरम्यान, या घटनेबाबत पीडितेच्या आईने मुख्याद्यापकांना जाब विचारला. प्रकरण शाळेत पोहचल्याचं कळताच आरोपी चंद्रमणी याने तेथून पळ काढला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिलियन पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.स्थानिक पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांनी देखील या संदर्भात एक अहवाल तयार करून जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. शालेय पोषण आहार मदतणीस म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीनेच विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.





