Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ! १० दिवसांत किती रुपयांनी महागले?
Petrol Diesel Price : मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 108.45 रुपये, तर डिझेल प्रतिलीटर दर 95.02 रुपयांवर

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आता तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना आगामी काळात इंधनाचा वापर जपून करण्याचे आवाहन केल्यानंतर सर्वात आधी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
त्यानंतर चार दिवसांनी 20 मे रोजीपेट्रोलच्या दरात 86 पैसे आणि डिझेलच्या दरात 83 पैशांची दुसऱ्यांदा वाढ झाली. आज शनिवारी सकाळपासून तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. त्यानुसार पेट्रोलचा प्रतिलीटर दर 87 पैसे आणि डिझेलची प्रतिलीटर किंमत 91 पैशांनी वाढले आहेत.
गेल्या १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेल ५ रुपयांनी महागले
गेल्या १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेल तब्बल ५ रुपयांनी महागले आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 108.45 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा प्रतिलीटर दर 95.02 रुपयांवर पोहोचला आहे. Petrol Diesel Price
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कडाडले आहेत. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत होता. आगामी काळात खनिज तेलाचे दर वाढून पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा कायम राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
As per sources, Diesel prices increased by 91 paise per litre and petrol by 87 paise per litre. Diesel in Delhi hiked to Rs 92.49 per litre, and Petrol hiked to Rs 99.51.
RSP (Retail Selling Price) of four Metro cities for 19.05.26 are as follows:
MS (petrol) prices
Delhi…
— ANI (@ANI) May 23, 2026
पेट्रोल आणि डिझेलचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध
परंतु, युद्धाच्या परिस्थितीमुळे देशात इंधनाचा तुटवडा निर्माण होणार अशी अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरत आहेत. यावर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्टीकरण देत सांगितले की, “देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध असून पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये आणि आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे.” Petrol Diesel Price
पेट्रोल पंपांवर रांगा
दुसरीकडे, बुलढाणा, जळगाव आणि वाशिममध्ये पेट्रोल आणि डिझेल टंचाई निर्माण झाल्याने पेट्रोल पंपांवर रांगा नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आली. साहजिकच, या परिस्थितीनंतर नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हेही वाचा :
Pune News : पावसामुळे शहरात वाहतुक कोंडी.! रस्ते जलमय, ठिकाठिकाणी वाहतूक कोंडी






