काय करेल याचा नेम नाही.! ‘उर्फी जावेद’चा पुन्हा बोल्ड ड्रेसिंग सेन्स; मादक अंदाज पाहून….

मुंबई – अभिनेत्री, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये काम करणारी अभिनेत्री ‘उर्फी जावेद’ ही तिच्या हटके फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी ही अतरंगी लूक करुन फोटोशूट करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. अनेक लोक उर्फीला त्यामुळे ट्रोल करतात तर काही जण तिचं कौतुक करतात. गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात सुरु असलेला वाद अवघ्या महाराष्ट्राने पाहिला.
मात्र, अश्यातच अभिनेत्रीचे काही हटके लूकमधील फोटो समोर आले आहेत. सध्या उर्फीचे हे फोटो सोशलवर चांगलाच धुमाकूळ घालत असून, फॅन्सला देखील तिचा हा नवीन लूक आवडला असल्याचं दिसून येत आहे. नुकतंच उर्फीला मुंबईतील एका ठिकाणी स्पॉट करण्यात आलं होत.
यावेळी तिने काळ्या रंगाचा अतिशय विचित्र ड्रेस परिधान केला होता. तिचा हा हटके खूपच बोल्ड होता. उर्फीने काळ्या कपड्याला कट करून हा एक वेगळ्या प्रकारचा ड्रेस बनवला आहे, जो की चांगलाच हॉट आहे. सध्या अभिनेत्रीचे या लूकमधील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशलवर व्हायरल होत असून, फॅन्स देखील यावर कमेंटचा वर्षाव करत आहेत.





