कॉंग्रेसशासित राज्यांमध्ये नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी नाही
Updated On:

कोची : देशातील कॉंग्रेसशासित राज्यांमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी केली जाणार नाही अशी माहिती कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. आज पीटीआयशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की हा कायदा बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे.
तो लागू करण्याची सक्ती केंद्र सरकार संबंधीत राज्यांना करू शकणार नाहीं, त्यांना तशी ती करता येणार नाहीं असेही ते म्हणाले. वेणुगोपाल यांना या कायद्याच्या विरोधात निदर्शने केल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली आहे.
अटकेत असतानाच पीटीआयशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत त्यांनी असे विधान केल्यामुळे कॉंग्रेसने देश पातळीवर अधिकृतपणे हा निर्णय घेतला असल्याचे मानले जात आहे.




