Jairam Ramesh : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा आणि कमल नाथ यांनी पक्षाच्या भूमिकेशी विसंगत स्वरूपाची वक्तव्ये केली. त्यावर पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी कुठली कडवट प्रतिक्रिया टाळली. लोकशाही अंगिकारणारा कॉंग्रेस एकमेव पक्ष असल्याचे स्वपक्षीयांच्या वक्तव्यांतून सिद्ध होते, असे त्यांनी म्हटले. त्यातून त्यांनी कॉंग्रेसमध्ये (Jairam Ramesh) बोलण्याचे स्वातंत्र्य असल्याचे सूचित करण्याचा प्रयत्न केला. पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक स्तरावर पेचप्रसंग उद्भवले आहेत. त्याच्या झळा भारतातही गॅस टंचाईसदृश स्थितीने जाणवत आहेत. संबंधित स्थिती हाताळण्यात मोदी सरकार कमी पडत आहे. सरकारचे परराष्ट्र धोरण अयोग्य आहे, अशा आशयाची टीका कॉंग्रेसकडून केली जात आहे. मात्र, त्या टीकेला छेद देणाऱ्या भूमिका शर्मा आणि नाथ यांनी स्वतंत्रपणे मांडल्या. सरकार योग्य प्रकारे स्थिती हाताळत असल्याचे प्रशस्तिपत्र शर्मा यांनी दिले. तर, देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा नाही. सरकारकडे नियोजनाचा अभाव आहे, असे नाथ यांनी म्हटले. त्यांची वक्तव्ये स्वपक्षाची म्हणजे कॉंग्रेसचीच कोंडी करणारी मानली गेली. मात्र, पक्षाची कोंडी टाळण्याच्या उद्देशातून रमेश (Jairam Ramesh) यांनी अतिशय खुबीने प्रतिक्रिया दिली.