प्रमुख संस्थांमध्ये सगळीकडेच भाजपची माणसं… म्हणून जातगणना हवी – राहुल गांधी

चंदीगड – हरियाणातील प्रचार सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात जातनिहाय जनगणनेवर भर दिला. निवडणूक आयोगात भाजपचे लोक, ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांमध्येही भाजपचे लोक आहेत. इथे तुम्हाला गरीब आणि इतर जातीचे लोक सापडणार नाहीत. त्यामुळेच आम्ही जात जनगणनेची मागणी करत आहोत असे ते म्हणाले.
भारतीय जनता पार्टीचे लोक संविधानावर हल्ला करत आहेत. आम्ही त्यांना भारतात कोणाची लोकसंख्या किती आहे हे तपासायला सांगतो आहे. आरएसएस म्हणतो की जात जनगणना झाली पाहिजे, पण आतून नकार देते. तुम्हाला गरीब मागासलेला माणूस सापडणार कोणत्याही मोठ्या पदावर सापडणार नाही.
हा लढा हरियाणा वाचवण्यासाठी नाही, तर भारताला वाचवण्यासाठी आहे. देशातील सर्व संस्था आरएसएसकडे सोपवण्यात आल्या आहेत, ज्यावर नागपूरचे पूर्ण नियंत्रण आहे. भारतातील 90 टक्के जनतेला त्यात कुठेही जागा नाही असा आरोप त्यांनी केला.





