Maratha Reservation : ‘…तर महायुतीला विजयाचा टिळा लावू देणार नाही’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
Updated On:

Manoj Jarang । Maratha Reservation – आचारसंहितेपूर्वी मराठा आरक्षण जाहीर केले नाही तर निवडणुकीत कोणाचीही सुट्टी नाही. मग त्यांचे सगळे बाहेर काढणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या तर त्यांना विजयाचा टिळा लागू देणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या सरसकट आरक्षणाला विरोध करणआरे ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर पुण्यात दारु पिऊन गोंधळ घातल्याचा आरोप आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर जरांगेंनी पत्रकार परिषदेत मी कोणालाही विरोधक मानत नाही. मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावत नाही, असे म्हटले आहे.





