“…तर मी ‘ते’ सगळे व्हिडीओ बाहेर काढणार”; नितीन देशमुख यांचा शिंदे गटाला थेट इशारा

Updated On:
“…तर मी ‘ते’ सगळे व्हिडीओ बाहेर काढणार”; नितीन देशमुख यांचा शिंदे गटाला थेट इशारा

मुंबई : शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप  करत थेट इशाराच दिला आहे. सूरत आणि गुवाहाटीमधील अनेक व्हिडीओ आपल्याकडे असून, ते समोर आणण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. नितीन देशमुख एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. मात्र नंतर ते तेथून परत आले होते. अकोल्यात शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी शिंदे गटासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यवरही निशाणा साधला.

नितीन देशमुख यांनी मेळाव्यात बोलताना, “पाच दिवसांपूर्वी माझ्याविरोधात लाचलुपत विभागाची चौकशी लावण्यात आली. पोलीस महानिरीक्षकांनी तुमचं काही असेल तर वर जाऊन भेटा असं मला सांगितलं. आपल्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाची (ईडी) चौकशी लावायला हवी. ईडीची चौकशी लावली तर समाजात माझी इज्जत वाढली असती. माझ्या मुलाला चांगलं स्थळ येईल,” असा टोला यावेळी लगावला.

पुढे बोलताना म्हटलं,“माझ्या विरोधात कारवाई केली, तर माझ्याकडे अनेक व्हिडीओ आहेत, ते उघड करेन. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे, सत्तांतर घडवणाऱ्यांचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. पैशाने सत्तांतर झालं आहे, हे सिद्ध करेन. मी हे सिद्ध करू शकलो नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन,” असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. ५० खोके एकदम ओकेचं षडयंत्र गेल्या दीड वर्षांपासून सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.

“नारायण राणेंचं एक वक्तव्य मी ऐकलं, त्यामध्ये ते डुप्लिकेट सेना म्हणत होते. तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर त्यांच्या डोक्यावर खोटे केस आहेत. वयाच्या ७० व्या वर्षी डुप्लिकेट केस लावावे वाटतात याची तुम्हाला जरा लाज वाटू द्या. मुंबईत फिरणं मुश्कील आहे असं आव्हान देता. तुमच्या आमदाराकडे अंगरक्षक तरी आहेत, उद्धव ठाकरेंच्या आमदारांकडे अंगरक्षक नाहीत. मी मुंबईत येतो, तुम्ही फिरणं बंद करुन दाखवा,” असे आव्हानच नितीन देशमुख यांनी दिले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

2026-10-08 19:32:36

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव