Nana Patekar : असा ‘नटसम्राट’ होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव
नाना पाटेकर केवळ दिग्गज अभिनेतेच नाहीतर, सामाजिक भान जपणारे व्यक्ती होते. नाना पाटेकरांनी सप्टेंबर 2015 मध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या बरोबर नाम फाउंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना केली.

Nana Patekar – विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले. मराठी इंडस्ट्रीसोबत बॉलिवुडही गाजवणाऱ्या नानांच्या अकाली एग्झिटने मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
गोव्यातील डोनापावला येथील घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. निधन झाल्याची माहिती त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनी दिली.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांचे सकाळी 5:20 वाजता निधन झाले. घटनेवेळी त्यांच्यासोबत घरी कुटुंबातील कोणीही नव्हते. त्यांचे मित्र आणि काळजीवाहू उपस्थित होते.
पहाटे सुमारे 2:30 वाजता नानांनी एका मित्राला मेसेज करून सांगितले की, त्यांची प्रकृती ठीक नाही. त्यावेळी मित्राने तो मेसेज पाहिला नाही. नंतर फोन केला आणि पहाटे 4.०० वाजण्याच्या सुमारास ते नानांच्या घरी पोहोचले. त्यावेळी नानांना खूप घाम येत होता. त्यांची प्रकृती खालावत होती.
थोड्या वेळाने ते बेशुद्ध होऊ लागले. त्यानंतर रुग्णालयात एका काळजीवाहकाला पाठवण्यात आले आणि रुग्णवाहिका बोलावण्यात आली. जेव्हा आपत्कालीन पथक पोहोचले, तेव्हा नाना पूर्णपणे प्रतिसाद देत नव्हते.
पथकाने तत्काळ कार्डियाक मसाज सुरू केली. त्यांना पहाटे 4:20 ते 4:30 च्या दरम्यान मणिपाल रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांच्या मते, त्यांना रुग्णालयात मृत अवस्थेत आणण्यात आले होते.
नाना पाटेकर केवळ दिग्गज अभिनेतेच नाहीतर, सामाजिक भान जपणारे व्यक्ती होते. नाना पाटेकरांनी सप्टेंबर 2015 मध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या बरोबर नाम फाउंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना केली.
या संस्थेअंतर्गत महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना विशेष करून मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाते. नानांनी शेतकरी आत्महत्यांमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी साहाय्य केले.
त्यांनी अनेक कुटुंबांची शाळा आणि महाविद्यालयाची फी सुद्धा भरली. नाम फाउंडेशनने पाणीटंचाई दूर करण्यासाठीही काम केले. यामध्ये तलाव, विहिरी आणि बंधारे बांधणे, तसेच नद्या आणि कालव्यांचे पुनरुज्जीवन करणे यांचा समावेश होता.
विविध पुरस्काराने गौरव.!
नाना पाटेकर यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्यांनी 1989 च्या परिंदा चित्रपटात अण्णाची भूमिका साकारली होती, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. तसेच 1994 च्या क्रांतिवीर चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
1996 सालच्या अग्निसाक्षी चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. यामुळे त्यांना त्यांच्या कारकिर्दीत तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले.
भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल नाना पाटेकर यांना 2013 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाना पाटेकर यांची अभिनयाची जडणघडण रंगभूमीवर झाली.
सुरुवातीच्या काळात त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करत 1978 च्या गमन या चित्रपटातून फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत त्यांनी हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटांमध्ये काम केले.






