“…तर मी पायही छाटेन”; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ शेअर करत संदीप देशपांडे म्हणाले…

Raj Thackeray | राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला गेल्या काही दिवसांपासून तीव्र विरोध होत होता. राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निर्णय रद्द करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय (जीआर) रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांचे अभिनंदन केले. तसेच राज ठाकरेंच्या भाषणाचा एक जुना व्हिडिओ देखील शेअर केला आहे. Raj Thackeray |
राज्य सरकारने निर्णय रद्द केल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंचं अभिनंदन करणारी एक पोस्ट केली. राज ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओही संदीप देशपांडेंनी शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत ते म्हणाले, “साहेब, तुम्ही जे म्हणता तेच करता, मनापासून अभिनंदन.” Raj Thackeray |
राज ठाकरे व्हिडीओमध्ये काय म्हणाले ?
“राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही. मराठी माणसासाठी म्हणून कोणाचेही पाय चाटेन. कोणाचेही पाय चाटेन मी मराठी माणसासाठी, पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये, तर मी पायही छाटेन,” राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले. Raj Thackeray |
साहेब तुम्ही जे म्हणता तेच करता .मनापासून ‘अभिनंदन ‘ pic.twitter.com/OryESvhASg
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 30, 2025
समितीच्या अहवालानंतर पुढील धोरण ठरवले जाणार
हिंदी सक्तीच्या निर्णयात बदल करताना सरकारने अप्रत्यक्षपणे तिसरी भाषा हिंदी राहील अशा पद्धतीने निर्णय घेतला. त्यानंतर याविरोधात तीव्र पडसाद उमटण्यास सुरूवात झाली होती. पण, त्यापूर्वीच सरकारने त्रिभाषा सूत्र संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द केले. तसेच, या विषयावर सविस्तर अभ्यास करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात येणार असून, या समितीच्या अहवालानंतरच पुढील धोरण ठरवले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. Raj Thackeray |
हेही वाचा:





