‘…मग मी मोदीजींचा प्रचार करेन’ अरविंद केजरीवाल असं का म्हणाले ?

Arvind Kejriwal । छत्रसाल स्टेडियमवर आयोजित जाहीर सभेत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीका केली. त्यांनी दिल्लीतील भाजप आणि केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. डबल इंजिन सरकार म्हणजे दुहेरी लूट. गेल्या सात वर्षांपासून यूपीमध्ये दुहेरी इंजिनचे सरकार आहे, पण ते अपयशी ठरले आहे. असेही ते म्हणाले आहे.
जाहीर सभेला संबोधित करताना केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या 10 वर्षांच्या कार्यकाळावर प्रश्न उपस्थित केला. ‘या लोकांनी 10 वर्षात काहीही केले नाही. PM मोदी पुढील एका वर्षात 75 वर्षांचे होतील, त्यामुळे निदान काहीतरी करा. केजरीवाल पुढे म्हणाले, ‘जर पंतप्रधान मोदींनी 22 राज्यांमध्ये वीज मोफत केली तर मी मोदींचा प्रचार करेन.’
यावेळी केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “दिल्लीची सुरक्षा भाजपच्या ताब्यात आहे, पोलिस त्यांच्या पाठीशी आहेत, तरीही दिल्लीत गुन्ह्यांवर नियंत्रण का होत नाही?”
दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत केजरीवाल म्हणाले, “दिल्लीच्या बसमध्ये प्रवास करताना महिलांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते हे मला माहीत आहे. त्यामुळेच आम्ही बसमध्ये मार्शल तैनात करण्यास सुरुवात केली. या बस मार्शलमुळे अनेक मोठे गुन्हे रोखले गेले आहेत.”
भाजप सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, “हे लोक गरीब विरोधी आहेत. गरीब कुटुंबातील आणि 15,000 रुपये पगार घेणाऱ्या 10,000 बस मार्शलच्या नोकऱ्या काढून घेण्यात आल्या. हे लोक गरिबांच्या विरोधात काम करत आहेत. .” असं म्हणत केजरीवाल यांनी सरकारवर घणाघात केला.





