मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. मुंबईतील मेट्रोच्या कामावरून थोरात यांनी फडणवीस यांच्यावर ट्विटरच्या माथ्यमातून निशाना साधला.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई मेट्रोची फार चिंता आहे. मात्र त्यांनी मेट्रोच्या कामात अडथळे आणले नाहीत, सहकार्य केले तर ते ही मुंबई मेट्रोने विमानतळावर पोहचतील आणि वेळेत नागपूरचे विमान पकडू शकतील, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला.
विरोधी पक्ष नेते @Dev_Fadanvis यांना मुंबई मेट्रोची फार चिंता आहे, मात्र त्यांनी मेट्रोच्या कामात अडथळे आणले नाहीत, सहकार्य केले तर ते ही मुंबई मेट्रोने विमानतळावर पोहचतील आणि वेळेत नागपूरचे विमान पकडू शकतील.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 28, 2021
मुंबई येथील मेट्रोच्या कामावर सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधीपक्ष भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू आहे. मेट्रो कारशेडवरून देखील मोठ्या प्रमाणात वाद झाला होता. भाजपकडून मेट्रोच्या कामात अडथळा आणला जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून सतत करण्यात येतो. तर भाजपही याला प्रत्युत्तर देते. हाच धागा पकडून थोरात यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.