…तर कॉंग्रेसच्या 5 -6 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल; एच. डी. कुमारस्वामी यांची सिध्दरामय्यांवर टीका

बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या जर एवढे प्रामाणिक असतील तर त्यांनी त्यांच्याविरुद्ध राज्य लोकायुक्तात प्रलंबित असलेल्या 70 खटल्यांबाबत जनतेला माहिती द्यावी असे आव्हान केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी त्यांना दिले. बेंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना कुमारस्वामी म्हणाले, सिद्धरामय्या यांनी स्वत:ला वाचवण्यासाठीच लोकायुक्त संस्था बंद करून भ्रष्टाचार विरोधी ब्युरोची स्थापना केली होती, असा आरोप त्यांनी केला आहे.
काँग्रेस सरकार १२ वर्षे जुन्या प्रकरणात मला तुरुंगात पाठवण्याचा कट रचत आहे. जर अशी परिस्थिती उद्भवली तर मी स्वेच्छेने माझ्या पदाचा राजीनामा देईन. त्यांनी अप्रत्यक्षपणे सीएम सिद्धरामय्या यांच्यावर दाखल केलेल्या एफआयआरचा संदर्भ देत म्हटले की ज्या लोकांनी माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या डोळ्यात अश्रू आणले ते नष्ट होऊन जातील. कर्नाटकात हेच होत आहे. काँग्रेस सरकारवर निशाणा साधत केंद्रीय मंत्र्याने दावा केला की जर त्यांनी त्यांच्या ताब्यातील कागदपत्रे उघड केली तर सिद्धरामय्या सरकारमधील पाच ते सहा कॅबिनेट मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल. मात्र, केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांचे सर्व दावे खोटे असल्याचे सिद्धरामय्या म्हणाले.
दरम्यान, कुमारस्वामींच्या सर्व वक्तव्यांवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असा दावा सिद्धरामय्या यांनी केला असून, भाजपमध्ये भ्रष्ट लोकांचा भरणा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर कारवाई करावी. हरियाणातील प्रचाराच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (मुडा) प्रकरणाचा उल्लेख केल्यानंतर मोदींनी हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट का दिली नाही असा सवाल सिध्दरामय्या यांनी केला. त्यांनी मणिपूर हिंसाचाराकडे लक्ष का दिले नाही किंवा तिथे भेट का दिली नाही? शनिवारी त्यांच्या कायदेशीर सल्लागारांसोबत झालेल्या बैठकीबाबत विचारले असता, सिद्धरामय्या यांनी दावा केला की, काँग्रेसचे आमदार एएस पोन्ना हे माझे कायदेशीर सल्लागार असल्याने मी रोज त्यांच्याशी कायदेशीर बाबींवर चर्चा करतो.





