Crime News : बंद घर फोडून घरगुती साहित्याची चोरी; शिरूर तालुक्यातील मलठण येथील घटना

शिरूर : शिरूर तालुक्यातील मलठण गावच्या हद्दीतील निमगाव दुडे-शिंदेवाडी रोडलगत असेल्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरगुती साहित्याची चोरी केली आहे. अंदाजे ३७,५००/- रुपये किमतीचे घरगुती साहित्य चोरी केल्याची माहिती आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी स्मिता शाम गलांडे (वय ४६ वर्षे, रा. तुळजाभवानी नगर, खराडी, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ३० जून २०२५ रोजी दुपारी ३.३० वा. ते १ जुलै २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान त्यांच्या मालकीच्या बंद घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडले आणि घरात प्रवेश करून घरातील साहित्य चोरून नेले आहे.
सदर चोरीबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा तपास शरद वारे हे करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
चोरीली गेलेले साहित्य खालीलप्रमाणे
अंदाजे ५ हजार किंमतीची किचनमधील स्टील भांडी, पिजेन कंपनीची गॅस शेगडी व एच. पी. गॅस सिलिंडर, ३० हजार किंमतीचे लाकडी किंग साईज बेड, गादी, उशी, चटई, बेडशीट, ब्लँकेट, खिडक्यांचे पडदे व इलेक्ट्रिक वायर, स्विच, पाचशे रुपये किंमतीचा हिटर कॉईल, १ हजार रुपये किंमतीचा एलईटी आरसा, १ हजार किंमतीच्या दोन एलईडी मरकरी लाइट्स इत्यादी वस्तू चोरीला गेल्या आहेत.





