Eknath Khadse | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावच्या मुक्ताईनगरमधील निवासस्थानी घरी चोरी झाली आहे. खडसेंच्या जळगावमधील निवासस्थानी चोरट्यांनी मध्यरात्री दरवाजाचे कुलूप तोडून चोरी केली. लाखोंचा मुद्देमला चोरट्यांनी लंपास केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. चोरट्यांनी एकनाथ खडसे यांच्या घरातील तळ मजला आणि पहिला मजल्यावरील खोल्यांमधील कपाट उघडून चोरी केली आहे. चोरट्यांनी खडसेंच्या घरातील सर्व सामान अस्थव्यस्थ केले आहे. ‘चोरट्यांनी घेऊन सर्व खोल्या तपासलेल्या दिसत आहेत, काही सामान चोरी गेले आहे. माझ्या खोलीत ३५ हजार रुपये होते आणि चार सोन्याच्या अंगठ्या होत्या. एकंदरीत सात ते आठ तोळे सोनं तेथून चोरी गेले आहे. चोरीची घटना किती वाजता घडली याबद्दल सांगता येणार नाही. कारण चोरी झाली त्या वेळी नेमका वॉचमन जागेवर नव्हता’, असेही खडसे यांनी सांगितले. Eknath Khadse | रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर चोरीची घटना दरम्यान, घटनास्थळी जळगाव पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी दाखल झाले असून त्यांच्याकडून पाहणी केली जात आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपावर देखील चोरीची घटना घडली होती. यावेळी पाच दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून एक लाखाहून अधिक रक्कम लुटली होती. Eknath Khadse | हेही वाचा: पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण: “230 कोटी रुपये गोठवा…”; रवींद्र धंगेकर यांचे नवे ट्वीट चर्चेत, केली ‘ही’ मोठी मागणी