Pimpri-Chinchwad: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर
देवेंद्र तायडे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीच्या नियुक्त्यांना प्रदेशाध्यक्ष रविंद्र पवार यांनी मान्यता दिली आहे. जिल्हाध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी प्रस्तावित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना मान्यता मिळाल्याने शहरातील पक्ष संघटनेला नवे बळ मिळणार आहे.
या कार्यकारिणीत शहर सचिव, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, चिटणीस, संघटक सचिव आणि सचिव अशा एकूण २५ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र पवार यांनी यासंदर्भातील मान्यतेचे पत्र दिले आहे. त्यानुसार, प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार प्रस्तावित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना मान्यता देण्यात आली आहे.
नव्या कार्यकारिणीत शहर सरचिटणीसपदी प्रा. जयंत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्ष तथा प्रवक्तेपदी काशिनाथ जगताप यांच्यासह शकुंतला भाट, प्रशांत कापसे, अनिल भोसले, अॅड. अमोल गव्हाणे, मयूर जाधव, माणिक जेड पाटील, सुनील कस्पटे, सचिन चावरे, अॅड. सोपान पाटील आणि अमोल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोषाध्यक्षपदी विजयकुमार पिरंगुटे यांची निवड करण्यात आली आहे. चिटणीसपदी अॅड. संतोष शिंदे, राजू खंडागळे, विजय बाबर, राहुल धनवे, संजीवनी पुराणिक आणि नितीन मोरे यांना संधी देण्यात आली आहे.
संघटक सचिवपदी ज्ञानेश आल्हाट, सुनील पवार आणि रणजीत आवटे यांची, तर सचिवपदी सुदाम शिंदे, विवेक विधाते आणि प्रमोदिनी लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे पिंपरी-चिंचवड शहरात पक्ष संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
Lakshmi Pujan : घरोघरी लक्ष्मीपूजनाची लगबग; सुख-समृद्धीच्या स्वागतासाठी सजली घरे!





