कात्रज येथे दर्गा आणि दोन मंदिरात चोरी
Updated On:

पुणे – कात्रज येथील खोपडेनगर येथे एक दर्गा आणि दोन मंदिरातून चोरी करण्यात आली. तिन्ही ठिकाणाहून एकूण 42 हजाराचा ऐवज चोरण्यात आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी साहिल खान (36,रा.पदमावतीनगर) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दस्तगीर दर्गा बंद असताना चोरट्याने पाठिमागील खिडकी तोडून आत प्रवेश केला. यानंतर दर्ग्याची दानपेटी आणि चार चांदीचे घोडे चोरुन नेले.
तसेच दर्ग्याजवळ असलेल्या शंकराच्या मंदिरातील दान पेटीतून 100 रुपये आणि खोपडेनगर येथील वाघजाई देवीच्या मंदिरातून दोन दानपेट्या फोडून सात हजाराची रोकड चोरुन नेली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड करत आहेत.





