Jairam Ramesh : सत्तेचा अहंकार आत्मघातकी असतो; जयराम रमेश यांची टीका
काँग्रेसचे सरचिटणीस (संपर्क विभाग) जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी विचारले की, या तपासाचा उद्देश केवळ किरकोळ चोरांना पकडणे हा आहे की, ज्यांच्या देखरेखीखाली आणि संरक्षणाखाली या घटना घडल्या, त्यांचीही जबाबदारी निश्चित करणे हा आहे.

Jairam Ramesh : अयोध्येतील मंदिराच्या देणग्यांच्या कथित चोरीच्या प्रकरणातील तपासात राम मंदिर ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय आणि इतरांना वाचवले जात आहे. सत्तेचा अहंकार आत्मघातकी असतो, हे विद्यमान पंतप्रधान जाणतीलच. असे असूनही या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन बाळगून आहेत, अशा शब्दांत काॅंग्रेसने (Jairam Ramesh) या प्रकरणी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
चोरीच्या रकमेबाबतचा व्हिडिओ ४ जून रोजी राय यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतरही एफआयआर दाखल करण्यास २१ दिवसांचा विलंब का झाला, असा सवालही विरोधी पक्षाने केला. काँग्रेसचे सरचिटणीस (संपर्क विभाग) जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी विचारले की, या तपासाचा उद्देश केवळ किरकोळ चोरांना पकडणे हा आहे की, ज्यांच्या देखरेखीखाली आणि संरक्षणाखाली या घटना घडल्या, त्यांचीही जबाबदारी निश्चित करणे हा आहे.
भगवान श्री राम यांच्या अयोध्या मंदिरासाठी दिलेल्या देणग्या चोरणाऱ्या चोरांबाबत मोदी सरकार इतके मवाळ का आहे? विरोधी पक्षाच्या नेत्यांविरुद्ध ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर करण्यास सरकार मागे-पुढे पाहत नाही; तरीही, अयोध्या राम मंदिरात देणगी चोरीच्या १०५ घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड होऊनही, मंदिराच्या प्रशासनाची जबाबदारी असूनही चोरांना पाठीशी घालणाऱ्या संशयितांपर्यंत तपास का पोहोचला नाही.
रमेश (Jairam Ramesh) पुढे म्हणाले की, चोरीच्या १०५ घटनांच्या तुलनेत केवळ ७९.८५ लाख रुपये वसूल करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न का केला जात आहे? चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना आरोपींऐवजी साक्षीदार का मानले जात आहे? असे का? त्यामुळेच काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र, निष्पक्ष आणि विश्वासार्ह चौकशीची सातत्याने मागणी केली आहे.
राम मंदिरासाठीच्या देणग्यांच्या चोरीप्रकरणी एसआयटीद्वारे केल्या जाणाऱ्या तपासाबाबत काँग्रेसने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली होणाऱ्या निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीतूनच सत्य समोर येऊ शकेल, असेही पक्षाने म्हटले आहे.






