गळफास घेऊन तरुणाने संपविली जीवनयात्रा
Updated On:

राहुरी (प्रतिनिधी)- चिंचविहीरे येथील हर्षल अनिल राणे या 26 वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरात कोणी नसताना दोरीच्या साह्याने छताला गळफास घेवून आत्महत्या केली. तालुक्यातील चिंचविहिरे परिसरातील स्वामीनगर येथे हर्षल राणे या 26 वर्षीय तरुणाने आपल्या घरामध्ये जीवनयात्रा संपविली.
त्यांनी जेव्हा गळफास घेतला. त्यावेळी घरामध्ये कोणी नव्हते. आज सकाळी या तरुणाच्या घरामध्ये शेजारील ओळखीच्या व्यक्तीने जाऊन पाहिले असता त्यांना या तरुणाने फाशी घेतल्याचे दिसले.
त्याचा मृतदेह पाहिल्यानंतर त्याने स्थानिक नागरिकांना तत्काळ या घटनेची माहिती दिली. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पसिरात हळहळ व्यक्त होत आहे.





