मंचर- करोना योद्ध्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता करोनाकाळात अत्यवस्थ रुग्णांना दिलासा देण्याचे केलेले सहकार्य अनमोल आहे. या शब्दांत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी करोना योद्ध्यांचे कौतुक केले.
मंचर उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भगवानराव वाघ,
प्रवीण मोरडे, अजय घुले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अंबादास देवमाने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, डॉ. गणेश पवार,
इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा डॉ. लीना गुजराथी, डॉ. हर्षद शेटे, डॉ. विनायक खेडकर, डॉ.आशिष पोखरकर, डॉ. सदानंद राऊत, डॉ. सुनिल खिंवसरा, डॉ. कैलास भागवत, डॉ. महेश गुडे, डॉ. तुषार हांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी. एन. बहिर, उपअभियंता सुरेश पठाडे, कनिष्ठ
अभियंता विद्युत अतुल जकाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता विजय आघाव, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. आरती भारती, गोवर्धन दूध उद्योग समुहाच्या वरिष्ठ अधिकारी सानिका कालेकर, निरगुडसर गावचे माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील यांचा करोनायोद्धा म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.