Disla Gam Bai Disla 2.0‘ | Gautami Patil – ‘प्रेमाची गोष्ट २’ दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत असतानाच, या चित्रपटातील तिसरं गाणं ‘दिसला गं बाई दिसला २.०’ सध्या प्रेक्षकांच्या भेटीला असून, सोशल मीडियावर गाण्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. आधीच ट्रेंडिंगमध्ये असलेल्या पहिल्या दोन गाण्यांनंतर हे गाणंही रसिकांच्या भेटीला आलं आहे. ‘दिसला गं बाई दिसला २.०’ या नव्या आवृत्तीने नवा झगमगाट दिला आहे. गौतमी पाटीलच्या अफाट एनर्जीने आणि ललित प्रभाकरच्या जबरदस्त साथीनं या गाण्याला एक वेगळंच रूप मिळालं आहे. राधा खुडे, आदर्श शिंदे आणि विश्वजीत जोशी यांच्या आवाजात हे गाणं आणखीनच रंगतदार झालं असून, सोशल मीडियावर मात्र ट्रोलिंगचा सामना कारावाला लागत आहे. गाण्याचं हे युनिक व्हर्जन सिनेरसिकांना फारस आवडलं नाही. त्यामुळे गाण्यातील मुख्य कलाकार गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गाण्याचे पूर्वीचे बोल आणि नव्या बीट्सचा मेळ, आधुनिक झंकाराची मिसळ, आणि गौतमी पाटीलच नृत्य यामुळे प्रेक्षक नाराज असल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कमेंटचा चांगलाच भडीमार केला आहे. तर पूर्वीच्या गाण्याला कुठंतरी डाग लावण्याचं काम यामाध्यमातून होत आहे, असं देखील बोललं जात आहे. “गाण्याचे पूर्ण वाट लावली ह्या बाई (गौतमी) ने..”, “चाबकाचे फटके दिले पाहिजेत…”, “मराठी संस्कृतीची वाट लावणारे काही चित्रपट बनवायचे आणि मराठी प्रेक्षक नाही म्हणून बोंबलायचं” अश्या अनेक कमेंट या गाण्याच्या व्हिडिओवर नेटकरी करत आहेत. तसेच “जुनं ते सोनं..”, “अजून एका चांगल्या गाण्याचा सत्यानाश केला..” असं देखील बोललं जात आहे.