Lalit Prabhakar : मेरी दुल्हन आजादी है.! वयाच्या ३९व्या वर्षीही ललित प्रभाकर अविवाहित का? चॉकलेट बॉयने सांगितलं खरं कारण….
ललितने आपल्या या निर्णयामागचं आणखी एक कारण सांगितलं होतं. सध्या त्याचं लक्ष कामावर असून, आपल्या आवडीचं काम करण्याचा तो आनंद घेत आहे.

Lalit Prabhakar : मराठी मनोरंजनविश्वातील देखणा, गुणी आणि आपल्या सहजसुंदर अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर! ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील आदित्यच्या भूमिकेतून घराघरांत पोहोचलेल्या ललितने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं.
रोमँटिक भूमिका असोत किंवा गंभीर व्यक्तिरेखा, प्रत्येक भूमिकेत वेगळेपण जपण्याची त्याची हातोटी चाहत्यांना भावते. आता ‘प्रहार’ या चित्रपटातील अजमल कसाबच्या भूमिकेमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. पडद्यावरचा चॉकलेट बॉय थेट नकारात्मक भूमिकेत दिसल्याने त्याच्या अभिनयातील बदलाची चर्चा रंगली आहे.
मात्र, ललितच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयीही चाहत्यांना उत्सुकता आहे. वयाची ३९ वर्षे पूर्ण केलेल्या या अभिनेत्याने अद्याप लग्न का केलं नाही? त्याच्या आयुष्यात जोडीदार नाही की लग्नाबाबत त्याचे विचार वेगळे आहेत? असे प्रश्न अनेकांना पडतात. यावर ललितने एका मुलाखतीत दिलेलं उत्तर विशेष लक्षवेधी ठरलं आहे.
ललित प्रभाकरने एका मुलाखतीत लग्नाविषयी बोलताना सांगितलं होतं की, मेरी दुल्हन तो आजादी है… लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींनी एकत्र येणं नाही, तर त्यासोबत अनेक जबाबदाऱ्याही येतात. सध्या आपण त्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं.
ललितने आपल्या या निर्णयामागचं आणखी एक कारण सांगितलं होतं. सध्या त्याचं लक्ष कामावर असून, आपल्या आवडीचं काम करण्याचा तो आनंद घेत आहे. अशा परिस्थितीत लग्नासारखी मोठी जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी आपण स्वतः तयार असणं आवश्यक असल्याचं त्याला वाटतं.
“कारण आता माझा फोकस वेगळा आहे. माझं काम वगैरे या गोष्टी सध्या सुरू आहेत आणि मी त्या गोष्टी एन्जॉयही करतो आहे,” असं त्याने सांगितलं होतं. “ती जबाबदारी घेण्यासाठी मी तयार नसेन आणि मी लग्न केलं, तर मग ते अन्याय केल्यासारखं होईल. मला माझ्यावर किंवा अन्य कोणावरही अन्याय करायचा नाहीये,” असं ललितने म्हटलं होतं.







