‘ज्या प्रकारे तुझ्या बापाची…’; झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी

Zeeshan Siddique | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. झिशान सिद्दिकी यांचे वडील माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबर 2024 ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आता पुन्हा झिशान सिद्दिकी यांना धमकी आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस वांद्रे येथील झिशान सिद्दिकी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘ज्या प्रकारे तुझ्या बापाची हत्या झाली, त्याचप्रकारे तुझी हत्या होणार,’असा धमकीचा मेल झिशान सिद्दिकी यांना पाठवण्यात आला आहे. डी कंपनीच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. धमकी आल्यानंतर, पोलिसांचे पथक झिशान सिद्दीकी यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत.
10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी
झिशान सिद्दिकी यांना गेल्या 2 दिवसांपासून धमकीचे मेल येत असल्याची माहिती आहे. या मेलमध्ये 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. रिमायंडर साठी प्रत्येकी 6 तासांनंतर मेल करणार असल्याचा उल्लेख आहे.
सहा महिन्यांपूर्वी झाली बाबा सिद्दिकींची हत्या
माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईतील खेरवाडी येथील त्यांच्या कार्यालयासमोरच शनिवार दि. 12 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री मारेकऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार करीत हत्या केली होती. त्यांना जखमी अवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. Zeeshan Siddique |
या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. यादरम्यान आता झिशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा धमकी आल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. Zeeshan Siddique |
हेही वाचा:
KKR vs GT : ‘मस्त दिसतोयस, लग्न ठरलंय का?’, अचानक विचारलेल्या प्रश्नावर गिलने काय दिलं उत्तर?





