अखेर प्रतिक्षा संपली! ठाकरे बंधुंच्या युतीच्या घोषणेची वेळ आणि तारीख ठरली…

Uddhav Thackeray and Raj Thackeray | शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या दृष्टीने दोन्ही पक्षातील नेत्यांसह प्रमुखांच्या भेटगाठी वाढल्या आहेत.
यादरम्यान ठाकरे बंधु युतीची घोषणा कधी करणार? याबाबत विचारणा केली जात होती. अखेर ती तारीख अणि वेळ निश्चित झाली आहे. खासदार संजय राऊत यांनी स्वत: ट्वीट करत युतीच्या अधिकृत घोषणेची तारीख सांगितली आहे.
उद्या
१२ वाजता pic.twitter.com/ob47tQxhGG— Sanjay Raut (@rautsanjay61) December 23, 2025
संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटो शेअर केला आहे. यात राज ठाकरे उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देत असल्याचे दिसत आहे. सोबतच या फोटोला कॅप्शन देत संजय राऊत यांनी ‘उद्या १२ वाजता’ असे लिहिले आहे.
यावरून बुधवारी (दि. २४) दुपारी १२ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे युतीची घोषणा करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. Uddhav Thackeray and Raj Thackeray|
युती आणि जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता
दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्यांची जागा वाटपासंदर्भात बैठक झाली असून आता दोन्ही प्रमुख नेते एकत्र येणार आहेत. या दोन्ही नेत्यांकडून उद्या दुपारी ठाकरे बंधूंच्या युती आणि जागावाटपाची घोषणा केली जाऊ शकते.
नुकतेच पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी, युती झालेली असून केवळ जागावाटपासंदर्भातली घोषणा बाकी आहे. आमच्यात जागा वाटपावरून कोणताही विसंवाद नाही. वरळीमधील डोमममध्ये जेव्हा दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच युती झाली, असे सांगितले. त्यानंतर आता ट्विट करुन संजय राऊत यांनी युतीच्या घोषणेचा मुहूर्त सांगितला आहे.
जागावाटपाचा फॉर्म्युला
मनसे आणि ठाकरे गटाचा मुंबई महानगरपालिकेसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यानुसार मुंबईतील एकूण 227 प्रभागांपैकी 145 ते 150 जागांवर ठाकरे गट निवडणूक लढवेल. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याला 65 ते 70 जागा येण्याची शक्यता आहे. तर ठाकरे बंधूंसोबत लढणाऱ्या शरद पवार गटासाठी 10 ते 12 जागा सोडण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे.
हेही वाचा:
दीपू हत्याकांडावरून गदारोळ! दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर गोंधळ ; विहिंपचा निषेध




