प्रतिक्षा संपली! या दिवशी कांताराचा प्रीक्वल होणार रिलीज; दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने दिली माहिती

Kantara Movie Update | दाक्षिणात्य अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा ‘कंतारा’ हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. कांतारा प्रदर्शित झाल्यानंतर बॅाक्स अॅाफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटाची देशभरात मोठी क्रेझ पाहायला मिळाली. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रीक्वलची आतुरतेने वाट पाहत असतानाचा चित्रपटाची नवी रिलीज डेट समोर आली आहे.
या चित्रपटाचा प्रीक्वल ‘कांतारा चॅप्टर-1’ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट यावर्षी २ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटावर ऋषिक शेट्टी आणि त्याच्या टीमने प्रचंड मेहनत घेऊन कांतारासारखी कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. 2023 मध्ये, कांताराचा प्रीक्वल येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. अखेर कांतारा चॅप्टर -1 रिलीज डेट जाहीर झाली आहे.
आम्ही खूप आनंदी आहोत आणि प्रेक्षकांचे आभारी आहोत, ज्यांनी कांताराला प्रचंड प्रेम आणि पाठिंबा दिला. तसेच हा प्रवास पुढे नेत आणि देवाच्या आशीर्वादाने चित्रपटाने १०० दिवस यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. मला ही संधी कांताराच्या प्रीक्वलची घोषणा करण्याची मिळाली आहे. तुम्ही जे पाहिले ते खरे तर भाग 2 आहे, भाग 1 हा या वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे ऋषभने सांगितले आहे.
ऋषभ शेट्टीचा कांतारा हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले. सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटांपैकी कांताराचा समावेश होता. या चित्रपटाने जगभरात 400 कोटींची कमाई केली होती. आता कांतारा चॅप्टर 1 अॅाक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे.





