Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी ६’चा बिगुल वाजला.! नव्या थीमची झलक आली समोर; स्पर्धकांची नावं….

Bigg Boss Marathi 6 | Ritesh deshmukh : ‘बिग बॉस हिंदी‘च्या चर्चेनंतर आता अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे ती म्हणजे ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाची. सोशल मीडियावर स्पर्धकांबाबत तर्कवितर्क लढवले जात असतानाच, आता या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये रितेश देशमुखचा ‘भाऊ’ अवतार आणि खेळाची गूढ थीम पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
यंदाची थीम काय?
प्रोमोमध्ये रितेश देशमुख एका वेगळ्याच स्वॅगमध्ये दिसत आहे. “फॅन्सचा जीव जडला, की ते पाठ नाही सोडत आणि आपण शब्द दिला की मागे नाही हटत…” अशा कडक शब्दांत त्याने या सीझनची घोषणा केली आहे.
View this post on Instagram
यंदाच्या थीमबद्दल भाष्य करताना रितेश म्हणतो, “याला प्रेम म्हणा नाहीतर वेड, चकवा देणार यंदाचा खेळ… शेकडो दारं खिडक्यांनी सजलाय घराचा जंगी थाट… दारापलिकडचं सरप्राइज ठरवेल प्रत्येकाची वाट… तेव्हा घट्ट करा मन थंड ठेवा मस्तक, ऐका दारावरची दस्तक… दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!”
प्रोमोवरून स्पष्ट होतंय की, ‘बिग बॉस मराठी ६’ मध्ये स्पर्धकांना पावलोपावली अनपेक्षित धक्के बसणार आहेत. घराचा सेटअप शेकडो दरवाजे आणि खिडक्यांनी सजलेला असेल, जिथे प्रत्येक दरवाजामागे एक नवीन आव्हान किंवा सरप्राईज दडलेलं असेल. हा खेळ केवळ मनोरंजनाचा नसून, स्पर्धकांचं नशीब बदलणारा ठरणार आहे.
कधी आणि कुठे पाहता येणार?
नव्या वर्षाची सुरुवात धमाकेदार करण्यासाठी ‘बिग बॉस मराठी ६’ सज्ज झाला आहे. यंदा शोच्या वेळेत बदल करण्यात आला असून, रात्री ८ वाजल्यापासून प्रेक्षकांना मनोरंजनाचा हा डोस घेता येईल. त्यामुळे आता ११ जानेवारीला कोणते कलाकार या घरात प्रवेश करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





