ICC Women’s World Cup 2022 | मानधनाच्या अपयशाचा संघाला फटका

हॅमिल्टन – भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडमध्ये महिला विश्वकरंडक स्पर्धेत खेळत आहे. या संघात संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना असूनही संघाला म्हणावे तसे यश मिळताना दिसत नाही. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतरही भारतीय संघाला यजमान न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. मानधनाला येत असलेले अपयश संघाला भोवत आहे, अशा शब्दात नेटिझन्सनी भारतीय संघाच्या सुमार कामगिरीवर निराशा व्यक्त केली आहे.
या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंडमध्येच मालिका खेळला व विश्वकरंडक स्पर्धेसाठी महत्वाचा सरावही केला मात्र, त्याचा लाभ प्रत्यक्ष या स्पर्धेत दिसलेला नाही. त्यातच मानधनाला करोनाबाबतच्या विलगीकरणाच्या नियमामुळे त्या मालिकेत काही सामने खेळता आले नाहीत त्यामुळे तीला तेथिल वातावरणात अद्याप जुळवून घेता आलेले नाही हेच तीच्या कामगिरीतून दिसत आहे, असेही मत नेटिझन्सनी व्यक्त केले आहे.





