पुणे जिल्हा : कायदा, सुव्यवस्थेत गृहखात्याचे अपयश

अशोक पवार यांचा आरोप : सर्वसामान्यांचे काय
शिरूर – रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष ऋषीराज अशोक पवार यांच्या अपहरणाची घटना अतिशय निंदनीय आहे. विधानसभा निवडणुकीत असे गैरकृत्य शिरूर तालुक्याच्या इतिहासात प्रथमच घडले आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नाही, हे गृहखात्याचे अपयश आहे. आमदार पुत्र व साखर कारखान्याचे चेअरमन असणाऱ्या ऋषीराज पवार यांच्यावर असा प्रसंग येत असेल तर सामान्य माणसाचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे, असा सवाल शिरूर- हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी केला.
रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष ऋषीराज अशोक पवार यांना अपहरण करून खंडणीची मागणी केली. याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी आमदार अशोक पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यासंदर्भात आमदार अशोक पवार यांनी सांगितले
पवार म्हणाले की, अपहरण करणारी व्यक्ती चार ते पाच दिवस ऋषीराज पवार यांच्याबरोबर प्रचारात होती. काही लोकांचा पक्षात प्रवेश करून घ्यायचा आहे, असे सांगून ऋषिराज पवार यांना एकांतस्थळी घेऊन गेले. त्याठिकाणी एका खोलीत डांबून ठेऊन अश्लील व्हिडीओ बनविण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली. हा व्हिडीओ प्रसारित न करण्यासाठी १० कोटी रुपयांची मागणी केली. ते देण्याचे कबूल करून तेथून सुटका करून घेतली. अपहरण करणाऱ्या व्यक्तीला मदत करायला अजून दोन व्यक्ती होत्या. असे व्हिडीओ बनविण्यासाठी या व्यक्तीला समोरील १० कोटी रुपये कोण देणार होते, याचा तपास होणे गरजेचे आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हा प्रमुख पोपट शेलार म्हणाले की, जातीवाचक आरोप करण्याच्या आधी संपूर्ण प्रकरणाची माहिती आधी घेऊन मगच आरोप करावेत. उगाच जाती भेदभाव तेढ निर्माण करू नये. शिवसेनेचे सर्वजण महाविकास आघाडीसोबत प्रामाणिकपणे आहेत. घटनेचा तपास लवकर पूर्ण करून सत्य समोर यावे, अशी अपेक्षा आहे.
भेदभाव करून वातावरण तापवणे योग्य नाही
पवार म्हणाले की, अपहरण प्रकरणातील तीन व्यक्तीना अटक केली असून यात कोण कोण सहभागी आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत. शिरूर पोलिसांचे काम चांगले आहे, ते याचा छडा लवकरच लावतील. मी आज राजकीय भाष्य करणार नाही. ज्यांनी हे कृत्य केले त्यांच्याकडे एक महिन्यापासून एक चारचाकी गाडी नेहमीच येत- जात होती. चार दिवसांपासून तो राज बरोबर प्रचारात सक्रीय सहभागी होता. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवला. यात कोणतेही राजकारण नाही जातपात भेदभाव करून वातावरण तापवणे योग्य नाही. निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याने इतर गोष्टींत लक्ष देता येत नाही.
अपहरणाचा तपास पारदर्शक करा
विरोधकांना पराभव दिसत असून आमच्या कुटुंबाला यात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.मला वादविवाद नको म्हणून मी नेहमी पोलिसांपासून दूर असतो. आरोपीने हे सर्व १० कोटी रुपयांसाठी केल्याचे पोलिसांसमोर कबूल केले आहे. यात कुणाचे षडयंत्र आहे. यात कोण कोण सहभागी आहेत, याचा तपास, चौकशी पारदर्शकपणाने व्हावी, हे कृत्य करणारी व्यक्ती चार ते पाच दिवस आमच्या संपर्कात आली. परंतु हे षडयंत्र एक महिन्यापासून सुरू होते, अशी मागणी समोर येत आहे.





