Dattatray bharane : “कुणाच्या मनाला वेदना होऊ नयेत ही शिकवण साधू संतांची” – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

इंदापूर : राज्याच्या, देशाच्या, भूमीला साधुसंतांची परंपरा, त्यांच्या अभंगातून प्रबोधन शिकवण ही खऱ्या अर्थाने मानव जातीमध्ये कोणाच्याही मनाला वेदना होऊ नयेत, ही शिकवण लहान थोरांनी तंतोतंत पाळावी,यासाठी हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून हरिनामाचा गजर होत आहे. असे प्रतिपादन,राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर शहरातील शहा संस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या, अखंड हरिनाम सप्ताहाची व माऊली गाथा पारायण सोहळ्याची समाप्ती ह.भ.प.श्रीगुरु हरिदास रामभाऊ बोराटे आजरेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने शनिवार (ता.१३ रोजी) करण्यात आली.
यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सप्ताहास भेट दिली.सप्ताहाचे संयोजक ह.भ.प भरत शहा व ह.भ.प.श्रीगुरु हरिदास
रामभाऊ बोराटे(आजरेकर)यांच्या हस्ते कृषी मंत्री भरणे यांचा विशेष सन्मान पार पाडला.यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.
पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, प्रत्येकाने आपले आयुष्यात एक लक्षात ठेवले पाहिजे,आयुष्य खूप सुंदर आहे. जरी प्रत्येकाला स्वार्थ असला तरी देखील, तो बाजूला सोडून आपणाकडून जेवढे लोकांचे चांगले करता येईल, तेवढे करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे, या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू ठेवण्यासाठी भरत शहा यांनी, मोठी मदत केली आहे.वारकऱ्यांना सेवा सुविधा उपलब्ध करून दिले आहेत, अशीही माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.
“मंत्री असलो तरी देखील हरी नामात वेगळाच आनंद ”
मी राज्याचा कृषी मंत्री असलो तरीदेखील, येथील अखंड हरिनाम सप्ताह हरिनामाचा गजर,संतांचे विचार,हे मनाला सुखच समाधान देणारे आहेत. हा आनंद सप्ताहाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील जनतेला मिळतोय ही मोठी गोष्ट आहे. या सप्ताहास भेट देऊन खूप आनंद वाटला, अशीही प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे अखंड हरिनाम सप्ताहात,राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सन्मान करताना भरत शहा तसेच ह.भ.प.श्रीगुरु हरिदास बोराटे( आजरेकर).





