राज्य अंधारात बुडणार!
Updated On:

मुंबई – आठवडाभरात महाराष्ट्र अंधारात बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यात यंदा विजेची मागणी 20 टक्क्याने वाढली आहे. तब्बल 2600 मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला असून वीज प्रकल्पांमध्ये केवळ 35 टक्के कोळसासाठा आहे. त्यातच परळी आणि भुसावळ वीज प्रकल्पात जेमतेम 1 दिवसाचा साठा आहे. तर कोराडी, नाशिक वीज प्रकल्पात फक्त 2 दिवसांचा, पारसमध्ये 5, खापरखेड्यात 6, तर चंद्रपुरात 7 दिवस पुरेल एवढाच कोळसा आहे.




