लोकोपयोगी निर्णय रद्द करून राज्य सरकार जनतेची उपेक्षा करतेय – महेश तपासे
Updated On:

मुंबई – मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. हे निर्णय रद्द करण्याचा सपाटा शिंदे-फडणवीस सरकारने लावला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. यातून जनतेची फार मोठी उपेक्षा होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. हे निर्णय रद्द करण्याचा सपाटा शिंदे-फडणवीस सरकारने लावला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते @maheshtapase यांनी केला आहे. यातून जनतेची फार मोठी उपेक्षा होत असल्याची टीकाही त्यांनी केली. pic.twitter.com/OY7BQTCA9Q
— NCP (@NCPspeaks) August 4, 2022
यावरच न थांबता विविध महामंडळे, मागासवर्गीय आयोग, आदिवासी विभागावर केलेल्या नियुक्त्यादेखील शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केल्या आहेत. या रद्द केलेल्या नियुक्त्यांविरोधात जस्टिस गंगापूरवाला यांच्या खंडपीठाकडे एक याचिका दाखल झाली असून यासंबंधी जस्टिस गंगापूरवाला यांनी महाराष्ट्र शासनाकडून खुलासा मागवला आहे, अशी माहिती तपासे यांनी दिली.





