आवाज घुमणार शिवतीर्थावरच! दसरा मेळाव्याला ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा करणार का?

Thackeray Shivsena Dasara Melava | उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली. त्यामुळे यंदाही 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरेंचा आवाज घुमणार आहे. दसरा मेळाव्याला परवानगी देताना 25 अटी प्रशासनाकडून घालण्यात आल्या आहेत.
बीएमसीने ही परवानगी काही अटींवर दिली आहे. त्यात ध्वनिप्रदूषण नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, स्वच्छता आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. पक्षाने या अटी मान्य केल्या आहेत. गेल्या वर्षीही उद्धवसेनेला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची परवानगी मिळाली होती. मात्र महापालिका निवडणुका आणि मनसेसोबत युतीच्या चर्चेमुळे यंदाच्या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
आवाज घुमणार शिवतीर्थावरच!
दसरा मेळावा २०२५ pic.twitter.com/HVfCuQILzI— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 11, 2025
ठाकरे बंधूंची कटुता कमी
मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील कटूता कमी झाली असून दोघांच्या भेटीगाठी देखील वाढत आहेत. याचदरम्यान काल अचानक उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या निवासस्थानी पोहचले. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी हे दोन्ही बंधू एकत्र येऊन सामोरे जातील अशी चर्चा रंगली आहे. या बैठकीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत, अनिल परब सुद्धा उपस्थित होते. मात्र, संजय राऊत यांनी ही भेट कौटुंबिक असल्याचं म्हटलं होतं. Thackeray Shivsena Dasara Melava |
मात्र आता उद्धव ठाकरें शिवसेना पक्षाच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थिती राहणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तसेच काल झालेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने काही चर्चा झाली आहे का? किंवा युतीसाठी दोन्ही नेते एकत्र येत संयुक्त घोषणा करणार का? याचीही उत्सुकता आहे. Thackeray Shivsena Dasara Melava |
हेही वाचा:
OBC Morcha : आता ओबीसी समाजही राजधानी मुंबईत धडकणार! दसऱ्यानंतर निघणार महामोर्चा; हालचालींना वेग





