Sonali Bendre : चेहऱ्यावरचं स्मितहास्य… बोलण्यातली लकब.. पहा कशी केली सोनालीने विदांची कविता सादर…

मुंबईः २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने साजरा केला. या दिनाचे औचित्य साधत मुंबईतील शिवाजी पार्कवर एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कला क्षेत्रासह विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या उपस्थित मान्यवरांनी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत कविता सादर केल्या. यामुळे व्यासपीठार कवितांची अनोखी मैफील पाहायला मिळाली. या मान्यवरांमध्ये सिनेसृष्टीतील अभिनेत्री सोनाली बंद्रे ही देखील उपस्थित होती. सोनालीने कविवर्य विंदा करंदीकर यांची घेता या कवितेचे सादरीकरण केले.
सोनाली अनेक महिन्यांत पहिल्यांदाच एका मराठी कार्यक्रमासाठी आली होती. तिचं स्मितहास्य सर्वांचे लक्ष विधून घेत होतं. व्यासपीठावरून उपस्थित असणाऱ्यांनी कवितेचे सादरीकरण केले. सोनालीचे नाव पुकारताच तिने आपल्यासोबत आणलेल्या पर्समधून एक चिठ्ठी बाहेर काढली आणि ती पुढे चालत जाऊन डेस्कसमोर उभी राहिली.
त्यानंतर त्या चिठ्ठीतील मजकूर वाचण्याआधी तिने आयोजकांचे आभार मानले आणि कवितेचे सादरीकरणास सुरूवात केली. कविवर्य विंदा करंदीकर यांची घेता कवितेचे सादरीकरण सोनाली उत्तमप्रकारे केले. तिच्या या सादरीकरणातून तिची मराठीवरची पकड अजूनही कायम असल्याचे दिसले. बोलण्यातील चढ उत्तार शब्दांची लकब यामुळे सोनाली सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती.
कवीतेचे नाव घेता
देणार्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
हिरव्या पिवळ्या माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी
वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नासाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्या भिमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी
देणार्याने देत जावे
घेणार्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्याचे हात घ्यावे.
तिच्या कवितेच्या सादरीकरणाला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटासह दाद दिली.





