Nagar | कचरा डेपोच्या जागेत आता स्मशानभूमी

नगर, (प्रतिनिधी) – सावेडी उपनगरातील आरक्षित भूखंडावर मनपाच्या वतीने कचरा डेपो सुरू करण्यात आला. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली.
त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. मात्र महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांनी पुढाकार घेत कचरा डेपो हलविण्यासाठी प्रयत्न केले, आणि त्याला अखेर यश आले.
तसेच आज अनेक वर्षाची प्रलंबित मागणी सावेडी उपनगराचा स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागला आहे. विविध जाती धर्मातील नागरिकांना या स्मशानभूमीचा उपयोग होणार आहे.
तृतीयपंथी नागरिकांच्या दफनभूमीसाठी शहरामध्ये जागाच उपलब्ध नव्हती त्यांना आता अधिकृत जागा मिळाली आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
सावेडी कचरा डेपो इथे स्मशानभूमीचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर,
नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेविका मीना चव्हाण, शिवाजी चव्हाण, माजी नगरसेवक सतीश बारस्कर, काजल गुरु, नाथा कराळे, दिलीप बारस्कर, बाबासाहेब बारस्कर,
गणेश बारस्कर, लैला शेख , सपना शेख, संध्या शेख, किरण नेटके, मनोज काळे, सचिन काळे, अशोक काळे, राजू काळे, रामदास काळे, सुरेश काळे, सतीश काळे,
जीवन चंदन, सावंत काळे, प्रशांत काळे, प्रदीप काळे, सविता काळे, छाया नवले, सागर काळे, विशाल काळे, योगेश काळे, करुणा काळे, वर्षा जाधव विकी भोसले, भापकर काळे मुकेश काळे, राहुल काळे, तुषार चव्हाण आदी उपस्थित होते
संपत बारस्कर म्हणाले, सावेडी उपनगराचा अनेक वर्षाचा स्मशानभूमीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. कचरा डेपोच्या जागेत सर्व जाती धर्मातील लोकांसाठी स्मशानभूमी तयार होत आहे. यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.
तृतीयपंथी, कोल्हाटी, पारधी समाजाला देखील या स्मशानभूमीमध्ये जागा देण्यात आली आहे. महापालिकेत कचरा डेपोचा ठराव रद्द करून स्मशानभूमी, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, हॉस्पिटल, गार्डन यासाठी ठराव करण्यात आला आहे. स्मशानभूमीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.





