Ajay Devgn। अभिनेता अजय देवगणच्या आगामी चित्रपटाची चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. अनेक चित्रपटांमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. अजय देवगणचा रेड सिनेमा सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली होती. त्यानंतर आता 2024 मध्ये या सिनेमाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. निर्माता आणि दिग्दर्शक अभिषेक पाठकने ‘रेड 2’चं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. तर आता त्यांनी या चित्रपटाबाबत मोठी अपडेट दिली आहे. एका मुलाखती दरम्यान त्यांना या चित्रपटाच्या शूटिंगबनबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले, ‘चित्रपट सध्या एडिटिंगच्या टप्प्यात आहे. आम्ही २-३ महिन्यांपूर्वी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. मी सध्या चित्रपटाच्या एडिटिंगमध्ये व्यस्त आहे.’ ‘चित्रपट प्रदर्शित झाल्यावर याबद्दल सविस्तर बोलू. मला आशा आहे की हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळेल. कथा पहिल्या भागाशी संबंधित आहे. अजय सर पण आहेत. यापेक्षा जास्त सांगता येणार नाही. चित्रपट खूप चांगला व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. बाकी जनताच ठरवेल.’ दरम्यान, अभिषेकने ‘रेड 2’चं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करतांना लिहिले होते की, “आणखी एक केस सोडवण्यासाठी आयआरएस ऑफिसर अमय पटनायक परतला आहे. 15 नोव्हेंबर 2024 रोजी नाट्य आणि रहस्य पाहायला सज्ज व्हा”. ‘रेड 2’ हा सिनेमा 15 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. अजय ‘रेड 2’ या सिनेमासह ‘सिंघम अगेन’, ‘औरें में कहां दम था’ आणि ‘मैदान’ या सिनेमात देखील पाहायला मिळणार आहे.