नवी दिल्ली – वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत सापडलेले शिवलिंगच आहे आणि ते देशातील 12 ज्योर्तिलिंगापैकीच एक आहे हे आम्ही सिद्ध करून दाखवू असे विश्व हिंदू परिषदेचे आलोक कुमार यांनी म्हटले आहे.ते म्हणाले की, आमचा विश्वास आहे की ते शिवलिंग आहे कारण नंदी त्याच्या समोरच नंदी आहे आणि हे स्थान सूचित करते की ते मूळ 12 ज्योर्तिलिंगांपैकी एक आहे. ज्ञानवापी मस्जिद संकुलातील वाजू खाना हे मोडतोड करण्यात आलेल्या जुन्या अवशेषांवर बांधले गेले आहे. या मंदिरावर मुघलांनी आक्रमण केले. आम्ही ते न्यायालयात सिद्ध करू शकू आणि सर्वोच्च न्यायालय या खटल्याचा निकाल देईल. प्रार्थना स्थळे (विशेष तरतुदी) कायदा 1991 वर ते म्हणाले,या प्रकरणात 1991 चा कायदा यावर लागू होईल यावर माझा विश्वास नाही. काशी विश्वनाथ मंदिरासाठी आधीच वेगळा कायदा आहे आणि आज सुप्रीम कोर्टाने देखील सूचित केले आहे की हा कायदा या प्रकरणाची सुनावणी करण्यात अडथळा करीत नाही. 1991 च्या कायद्याचा या प्रकरणात कोणतीही आडकाठी नाही असे सर्वोच्च न्यायालयानेच स्पष्ट केल्यानंतर तो विषयच आता उरत नाही असे ते म्हणाले. तत्पूर्वी, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशीद प्रकरण दिवाणी न्यायाधीशाकडून जिल्हा न्यायाधीश, वाराणसीकडे यांच्याकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.