शिवसेना नेत्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केला जीवघेणा हल्ला

Hindu Leader Sandeep Thapar attacked by Nihangs in Ludhiana Punjab @RavneetBittu @ANI @TajinderBagga @RealBababanaras @pun_fact pic.twitter.com/M8tbj7N5C5
— AA( Modi Ka Pariwar) (@TopSecretAA) July 5, 2024
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये संदीप थापर हे शुक्रवारी सकाळी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी घरून निघाले होते. यादरम्यान तीन जण एका स्कूटरवरून येत असल्याचे दिसत आहे. यानंतर एका आरोपीने वर्दळीच्या रस्त्यावरच संदीप थापर यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी थापर खाली पडले. यानंतर त्या अज्ञाताने चार ते पाच वेळा हल्ला केला. यादरम्यान तेथे उपस्थित जमावाने त्यांना वाचविण्याचा प्रयन्त केला. मात्र हे हल्लेखोर काही सेकंदातच स्कूटरवरून पळून गेले.
ही घटना घडली त्यावेळी जवळपास लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, आरोपींच्या हातात धारदार शस्त्रे पाहून त्यांच्या जवळ जाण्याचे धाडस कोणाचेच झाले नाही. आरोपींनी संदीप थापरला रक्तबंबाळ केले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. लोकांनी त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. त्यांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना डीएमसी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
थापर खलिस्तानविरोधात खूप बोलतात
मिळालेल्या माहितीनुसार, थापर अनेकदा खलिस्तानविरोधात वक्तव्ये करत असतात. याशिवाय पंजाबमधील शेतकरी आंदोलनाविरोधातही त्यांनी विधाने केली होती. हल्ला झाला तेव्हा थापर आणि त्यांचा बंदूकधारीही तेथे होता. मात्र, निहंगांनी त्यांना पकडले आणि त्यांची शस्त्रे हिसकण्याचाही प्रयत्न केला, असे त्यांचे म्हणणे आहे. थापर यांच्या समर्थकांनी सांगितले की, त्यांना बर्याच काळापासून धमक्या येत होत्या आणि त्यांच्याकडे फक्त एक बंदूकधारी देण्यात आला होता.
डीसीपी जसकिरणजीत सिंह तेजा यांनी सांगितले की, अज्ञात हल्लेखोरांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचे पथक आरोपीच्या शोध घेत आहे.





