‘शाका लाका बूम बूम’ फेम अभिनेत्याने मराठमोळ्या पद्धतीने बांधली लग्नगाठ

Entertainment News | ‘शाका लाका बूम बूम’फेम अभिनेता किंशुक वैद्यने मैत्रीण दीक्षा नागपालसोबत लग्नगाठ बांधली आहे. 22 नोव्हेंबरला अलिबागमध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडला. त्याच्या लग्नात कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होते.
ही दोघही लग्नात पारंपरिक कपड्यांमध्ये दिसले. दोघांचा मराठमोळ्या पद्धतीने विवाह पार पडला. किंशुक ऑफ व्हाईट रंगाची कुर्ता आणि धोतर परिधान केलं होते. तर दिक्षाने पारंपरिक महाराष्ट्रीयन लूक निवडला होता. लाल आणि केशरी रंगाच्या नऊवारी साडी तिने नेसली होती. दोघेही एकत्र खुपच छान दिसत होते. त्यांचे लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
किंशुक वैद्य आणि दीक्षा नागपाल यांनी अद्याप त्यांच्या लग्नाचे अधिकृत फोटो किंवा व्हिडिओ शेअर केलेले नाहीत. मात्र शाहीर शेखने त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. “किंशुक आणि दीक्षा या सुंदर जोडप्याचे अभिनंदन. मी तुम्हा दोघांनाही अद्भुत आणि जादुई आयुष्यासाठी शुभेच्छा देतो,” असे त्याने फोटोला कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
याशिवाय अभिनेता सुमेध मुदगलकरनेही या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. एका क्लिपमध्ये किंशुक आणि दीक्षा संगीतावर नाचताना दिसत आहेत.
दरम्यान, किंशुक आणि दिक्षा अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांचा गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात साखरपुडा पार पडला. किंशुक वैद्य हा ‘शाका लाका बूम बूम’ या शोमुळे खूप जास्त प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तर दीक्षाही कोरियोग्राफर आहे.





