Pune : आंबट-गोड बोरांचा हंगाम सुरू

पुणे : आंबट-गोड बोरं म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा बोरांचा हंगाम सुरू झाला अहे. मार्केटयार्डातील फळबाजारात होणारी बोरांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढली आहे. आवक आणखी वाढत जाणार असल्याची माहिती व्यापारी रवींद्र शहा यांनी दिली.
मागील पंधरा दिवसांपासून बोरांची आवक सुरू झाली आहे. सुरूवातीला तुरळक असणारी आवक आता वाढली आहे. मार्च अखेरपर्यंत ही आवक सुरू राहणार आहे. मार्केट यार्डातील फळ बाजारात दररोज दोन ते अडीच हजार पोती आवक होत आहे. सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यांसह राजस्थान येथून आवक होत आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे उत्पादन अधिक झाले आहे.
या बोरांना शहर आणि उपनगरांतील विक्रेत्यांसह पाचगणी, महाबळेश्वर, लोणावळा, कोकणासह पर्यटनस्थळांच्या ठिकाणांणाहून मागणी आहे. डिसेंबरअखेर ते संक्रातीपर्यंत बोरांना जास्त मागणी असते. मागील वर्षीच्या तुलनेत भाव स्थिर असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
सोलापूर, नगर जिल्ह्यांसह राजस्थानातून आवक
चमेली – २०० – २५० रु.
उमराण – ८० – १०० रु.
चेकनेट ६००-७०० रु.
चन्यामन्या ५५०-७५० रु.




