Rashtriya Swayamsevak Sangh : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा परीघ सातत्याने विस्तारत आहे…” – डॉ. मोहन भागवत
Rashtriya Swayamsevak Sangh : हे बदल केवळ प्रशासकीय असून मैत्री करणे आणि स्वतःच्या उदाहरणातून समाज परिवर्तन घडवणे, ही संघाची मूळ कार्यपद्धती कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Rashtriya Swayamsevak Sangh – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा परीघ सातत्याने विस्तारत असून, समाजाच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघाने आता संघटनात्मक पातळीवर विकेंद्रीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी दिली.
नागपूरच्या ‘तरुण भारत’ वृत्तपत्राच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी बदलत्या काळानुसार संघाच्या कार्यपद्धतीत होणारे बदल आणि ‘जेन झी’ यांच्याशी जोडले जाण्याच्या रणनीतीवर सविस्तर भाष्य केले. Rashtriya Swayamsevak Sangh
संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संघटनात्मक बदलांविषयी बोलताना डॉ. भागवत म्हणाले की, जेव्हा एखाद्या संघटनेचा विस्तार होतो, तेव्हा कामाचा डोलारा सांभाळण्यासाठी विकेंद्रीकरण ही नैसर्गिक प्रक्रिया ठरते. Rashtriya Swayamsevak Sangh
आतापर्यंत संघात प्रशासकीय सोयीसाठी ४६ प्रांत होते, मात्र आता ही रचना अधिक सूक्ष्म करून ८६ संभाग करण्यात आले आहेत. वरिष्ठ स्तरावरून होणारे निर्णय आणि उपक्रम आता या लहान घटकांमार्फत अधिक प्रभावीपणे राबवले जातील. Rashtriya Swayamsevak Sangh
मात्र, हे बदल केवळ प्रशासकीय असून मैत्री करणे आणि स्वतःच्या उदाहरणातून समाज परिवर्तन घडवणे, ही संघाची मूळ कार्यपद्धती कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. आजच्या तरुण पिढीचा कल राष्ट्रसेवा आणि प्रामाणिकपणाकडे असून संघ याच मूल्यांवर आधारलेला आहे, असे सांगत सरसंघचालकांनी सोशल मीडियाच्या प्रभावी वापराचे समर्थन केले.
विरोधाभासी विचारसरणीचे लोकही आता संघाच्या कामाचा आदर करू लागले आहेत, ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. या सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही उपस्थिती लावली.






