पिंपरी | वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून अजगराला जीवदान

कार्ला, (वार्ताहर) – लोणावळ्याजवळील औंढोली गावामध्ये आढळलेल्या आठ फूटी अजगराला पकडून जीवदान देत जंगलात सोडण्यात आले. मावळ वन्यजीव रक्षक संस्थेकडून ही कामगिरी करण्यात आली.
औंढोली येथील विजय सुतार यांचा रात्री ९.३० ला फोन आला की, आमच्या घराजवळ अजगर जातीचा साप आहे.
याची माहिती संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे व वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांना दिली. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य मोरेश्वर मांडेकर सह भटकंती सह्याद्री प्रतिष्टानचे सदस्य निलेश मांडेकर, राहूल मांडेकर, अजित विश्वासराव, मंगेश तायडे,
विजय सुतार, गोविंद सुतार, संतोष शेळके, नितीन मांडेकर यांनी तेथे जाऊन त्या अजगराला पकडून सुरक्षित जंगलात जाऊन सोडण्यात आले. कुठेही वन्यप्राणी आढल्यास त्याला न मारता त्याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्था ९८२२५५००४ यांना फोन करावे असे आवाहन मावळ वन्यजीव रक्षक संस्थेने केले आहे.





