‘पुष्पा 3’ चित्रपटातील आयटम साँगमध्ये दिसणार लोकप्रिय अभिनेत्री?

Pushpa 3 Film | अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. थिएटरमध्ये 50 दिवस पूर्ण झाल्यानंतरही चित्रपटाची कमाई थांबली नाही. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला देखील मोठा प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता ‘पुष्पा 3’ ची चर्चा सुरू झाली आहे.
पुष्पा फ्रँचायझीबद्दल सांगायचे तर, निर्मात्यांनी चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये प्रत्येकी एक आयटम साँग ठेवले होते. ज्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. स्टार संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी ‘पुष्पा द राइज’ आणि ‘पुष्पा द रुल’ मधील ‘ओ अंतवा मावा’ आणि ‘किसिक’ या दोन खास गाण्यांनी खळबळ उडवून दिली होती. दोन्ही चित्रपटांची ही गाणी यूट्यूबवर लाखो वेळा पाहिली गेली आहेत.
Instagram पर यह पोस्ट देखें
अशातच ‘पुष्पा 3’ मध्ये आयटम साँगमध्ये कोणती अभिनेत्री दिसणार याचा खुलासा झाला आहे. मेकर्स सध्या ‘पुष्पा ३’मधील आयटम साँगसाठी जान्हवी कपूरवर शिक्कामोर्तब करणार असल्याचं म्हंटले जात आहे. मात्र याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
जान्हवीने अलीकडेच ‘देवरा पार्ट 1’ या पॅन इंडिया सिनेमात ज्यु. एनटीआरसोबत काम केले होते. याद्वारे तिने साउथ इंडस्ट्रीतही स्वतःचं स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे देवी श्रीप्रसाद हे ‘पुष्पा 3’मधील आयटम साँगसाठी जान्हवी कपूरशी चर्चा करत असल्याचे सांगितले जात आहे.





