The Poona Club Swimming League 2024 : कुदो संघाला विजेतेपद…

पुणे :- पूना क्लब यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या द पूना क्लब स्विमिंग लीग 2024 स्पर्धेत अंतिम फेरीत सचिन राठी, तनुश्री राठी व देवर्या राठी यांच्या मालकीच्या कुदो संघाने 102 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
पूना क्लब स्विमिंग पूल येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत अतुल गोयल यांच्या मालकीच्या गोयल गंगा रियल रिच संघाने 86 गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. तर. राकेश नवानी यांच्या मालकीच्या जेट्स संघाने 84 गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला. स्पर्धेत 150 हुन अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेतील विजेत्या कूदो संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पूना क्लबचे अध्यक्ष सुनील हांडा, पूना क्लबचे उपाध्यक्ष व स्पर्धेचे चेअरमन गौरव गढोक, स्पर्धेचे प्रायोजक वेंकीज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालाजी राव व जगदीश राव, एएसआर डॉल्फिन्सचे मालक अमित रोपलेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक तुषार आसवानी, क्लबचे सचिव कर्नल सरकार, क्लबचे समिती सदस्य शुभा गडकरी, समीर संघवी व कुणाल संघवी आदी मान्यवर उपस्थित होते.





