Milind Soman : मिलिंद सोमण यांची कमाल! युरोप ते आफ्रिका अंतर पोहत केलं पार
Milind Soman : स्पेनमधील टारिफा ते मोरोक्कोचा समुद्रकिनारा यांच्यात १५ किलोमीटरचे अंतर

Milind Soman : मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण यांनी वयाच्या ६० व्या वर्षातही स्वत:ला एकदम फिट ठेवले आहे. सोशल मिडियावर ते अनेकदा व्यायाम करतानाचे अनेक फोटो शेअर करतात. मात्र आता त्यांनी एक मोठा विक्रम केला आहे. त्यांनी युरोप ते आफ्रिका हे अंतर पोहत पार केले आहे. त्यांनी स्वत: याबद्दल माहिती शेअर केली आहे.
मिलिंद सोमण यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “१ मेला मी पोहत युरोपमधून आफ्रिकेत गेलो. (Milind Soman)
View this post on Instagram
जिब्राल्टरची सामुद्रधुनी ओलांडली. स्पेनमधील टारिफा ते मोरोक्कोचा समुद्रकिनारा यांच्यात १५ किलोमीटरचे अंतर आहे. पोहण्याचा हा अनुभव खूपच सुंदर व अप्रतिम होता. याबद्दल लवकरच सविस्तर पोस्ट शेअर करेन.” (Milind Soman)
यासोबतच त्यांनी काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. एका फोटोत त्यांनी दोन्ही हातात भारताचा ध्वज पकडला असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ते समुद्रात पोहोत असल्याचे पाहायला मिळत आहे. आणखी एका फोटोत ते त्यांच्या पत्नीबरोबर दिसत आहेत.
सध्या त्यांच्या या कामगिरीनंतर अनेकांकडून तयांचे कौतुक केले जात आहे. याआधीही त्यांनी काही धावण्याच्या शर्यतीमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे या वयातही त्यांची एनर्जी पाहून अनेकजण थक्क होतात. (Milind Soman)
हेही वाचा:





