Hemant Dhome post : पुण्यातील ग्रामीण भागात मागील काही वर्षांपासून बिबट्याची दहशत वाढताना दिसत आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन आणि मागणी करूनही कोणत्याही उपायोजना केल्या जात नसल्याचा आरोप होत आहे. आता बिबट्याच्या हल्लात लहान मुलांचा जीव गेला आहे. पुण्यातील शिरूर भागात भागात नरभक्ष्यक बिबट्याने गेल्या २० दिवसात हल्ले करून ३ जणांचा जीव घेतला. या घटनेने या ठिकाणी तणावाचे वातावर तयार झाले आहे. पिंपरखेडच्या गावकऱ्यांनी आंदोलनाची हाक पुकारली असून याविरोधात मंचर येथे रस्ता आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे नाशिक महामार्गवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या सगळ्यात एका मराठी कलाकाराने एक्सवरून पोस्ट शेअर करत काही प्रश्न उपस्थित करत स्थानिक नेत्यांना सवाल केला आहे. मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमत ढोमे सोशल मीडियावर सक्रीय असून, तो अनेक मुद्यांवर निर्भिडपणे आपले मत व्यक्त करत असतो. नुकतीच त्याने एक पोस्ट एक्सवरून शेअर केली आहे. हेही वाचा : माजी मंत्री दीपक केसरकर अडचणीत! रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणानंतर होणार चौकशी या पोस्टमधून हेमंत याने गेल्या काही दिवसात माझ्या भागात ११ मृत्यू झाले आहेत… चित्र खूप भायानक आहे… प्रचंड भिती आहे… आता सहनशक्तीचा अंत होणार, लोक कायदा हातात घेणार यापेक्षा human-wildlife conflict वर sustainable उपाययोजना आणि कायदे आखण्यात यावेत…अशी मागणी केली आहे. जंगल संपवणाऱ्यांमुळे वर्षानुवर्षे शेती करणाऱ्या भुमीमालकांचं जगणं कठीण झालंय… हे आहेत माझ्याच शेतातले आजचे ताजे ठसे… एक अमोल कोल्हे सोडल्यास आमचे बाकीचे लोकप्रतिनिधी मात्र कशात मशगुल आहेत कोणास ठाऊक??? असा सवाल त्याने स्थानिक नेत्यांना विचारला आहे. सोबत एक फोटो देखील शेअर केला आहे. पुन्हा एक हल्ला आणि अजून एक चिमूरडा मृत्युमुखी… माझ्या पिंपरखेड गावात अजून एक बळी गेला… लहानगा रोहन बोंबे बिबट्याच्या हल्ल्यात दगावला… सरकारकडे पुन्हा एकदा मागणी आहे की लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात… आज जमावाने कायदा हातात घेतला आहे, गेल्या काही दिवसात… pic.twitter.com/FDLgYri96Q — Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) November 3, 2025 हेमंत ढोमेची पोस्ट पुन्हा एक हल्ला आणि अजून एक चिमूरडा मृत्युमुखी… माझ्या पिंपरखेड गावात अजून एक बळी गेला… लहानगा रोहन बोंबे बिबट्याच्या हल्ल्यात दगावला… सरकारकडे पुन्हा एकदा मागणी आहे की लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात… आज जमावाने कायदा हातात घेतला आहे, गेल्या काही दिवसात माझ्या भागात ११ मृत्यू झाले आहेत… चित्र खूप भायानक आहे… प्रचंड भिती आहे… पशूधनाची तर यात मोजणी सुद्धा झालेली नाही… आधीच अस्मानी संकटाने कंबरडं मोडलंय त्यात हे जंगली संकट! आता सहनशक्तीचा अंत होणार, लोक कायदा हातात घेणार यापेक्षा human-wildlife conflict वर sustainable उपाययोजना आणि कायदे आखण्यात यावेत… जनजागृती व्हावी… मागेच जवळपास २० वर्षांपूर्वी याबाबतीत विद्या अथ्रेया यांनी प्रचंड काम केलं आहे त्याकडेही डोळेझाक झाली आहे… आपण जंगलात घुसलो आहोत हे बरोबर आहे पण जंगलापासून दूर राहणाऱ्या शेतकऱ्यांना याचा त्रास भोगावा लागत आहे… जंगल संपवणाऱ्यांमुळे वर्षानुवर्षे शेती करणाऱ्या भुमीमालकांचं जगणं कठीण झालंय… हे आहेत माझ्याच शेतातले आजचे ताजे ठसे… एक अमोल कोल्हे सोडल्यास आमचे बाकीचे लोकप्रतिनिधी मात्र कशात मशगुल आहेत कोणास ठाऊक??? हेही वाचा : तुर्कीमध्ये बंद दाराआड ७ मुस्लिम देशांची गुप्त बैठक ; पाकिस्तानच्या उपस्थितीत रचला मोठा कट?