Daund News : नांदुरमध्ये बिबट्याची दहशत! ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Daund News : नांदूर ता दौंड रात्री दि ९ सप्टेंबर वार मंगळवार बिबट्याने शेळ्या मेंढ्यांवर हल्ला केल्याचा घटना घडली होती. यामुळे दौंड तालुक्यातील नांदुर ( बोराटे वस्ती ) येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. शेळ्या मेंढ्या बिबट्टयाने फस्त केल्या आहेत. या घटनेमुळे ग्रामस्थ घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. या सर्व घटनांची गंभीर दखल घेऊन शासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी नांदुर ग्रामपंचाय यांनी वनविभागाकडे केली आहे.
शेतकऱ्यांचा सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर
गेले अनेक महिन्यापासुन नांदुर शिवारात बिबट्या दिसल्याची चर्चा परिसरातील गावांमध्ये सुरू आहे. शेतामध्ये जाण्याचे टाळत आहेत. परिसरात वन्य प्राण्याचा चांगलाच वावर असल्याचे स्पष्ट होत आहे. अन्नाच्या शोधात हा बिबट्या नागरी वस्तीकडे आला असल्याचे अनेकांचे मत आहे. दरम्यान, बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील आदी गावच्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने शेतकरी शेतामध्ये. जाण्यातील टाळाटाळ करत आहे
शेतकऱ्यांची सुरक्षा हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. शेतामध्ये रानडूकर, हैदोस वाढला आहे. शेतामध्ये नाही गेले तर वन्यप्राणी पिके फस्त करतात. यामुळे वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोस्त करून भयमुक्त करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वनविभागाची तसेच रेस्क्यू या संस्थेची रेस्क्यू टीम रवाना करून बिबट्टया पकडण्यात यावा अशी मागणी नांदुर गावातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
संबंधित पुणे जिल्हाअधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, वनअधिकारी आदी सर्व प्रशासनिय यांनी लवकरात लवकर पाहाणी करून योगय निर्णय घेवा नांदुर गावातील शेतकरी किंवा शेतमजूर महिला व इतर कोणाचा बळी गेल्यास सर्व प्रशासकिय अधिकारी जबाबदार असतील असा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.





