“महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत भाजपचे सरकार पाडून उत्तर देईल”; अखिलेश यादव यांचे टिकास्त्र

Shivaji Maharaj Statue Collapsed । मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. विरोधकांकडून देखील राज्य सरकारवर सडकून टीका केली जात आहे. याप्रकरणावर आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील संताप व्यक्त करत सरकावर निशाणा साधला आहे. तसेच या घटनेची चौकशी करून कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अखिलेश यादव यांचे ट्वीट
अखिलेश यादव यांनी व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, “भाजपने केलेले प्रत्येक काम भ्रष्टाचाराचा बळी ठरत आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या पुतळ्याचे अनावरण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि ते कोसळणे दुर्दैवी घटना आहे. पुतळा उभारण्याशी संबंधित सर्व सरकारी आणि खासगी लोकांची सखोल चौकशी व्हायला हवी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली आहे. Shivaji Maharaj Statue Collapsed ।
भाजपा का बनाया हुआ हर निर्माण भ्रष्टाचार की भेंट चढ़ जाता है। महाराष्ट्र के सिंधुदुर्ग में लगी छत्रपति शिवाजी महाराज जी की जिस प्रतिमा का अनावरण स्वयं प्रधानमंत्री जी ने किया हो उसका गिर जाना बेहद दुर्भाग्यपूर्ण घटना है।
इसके निर्माण से संबंधित सभी सरकारी-गैर सरकारी लोगों की… pic.twitter.com/TUEb1y8aZd
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) August 26, 2024
अखिलेश यादव यांनी पुढे म्हटले आहे की, “ही केवळ महाराष्ट्राला नाही, तर संपूर्ण देशाच्या भावना दुखावणारी घटना आहे. महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत भाजप भ्रष्टाचाराच्या अशा कृत्यांना भाजपचे सरकार पाडून उत्तर देईल”, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली.
दोघांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी पहिली कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उप विभाग, मालवण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संबंधित जबाबदार दोघांविरुद्ध मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जयदीप आपटे हे कंपनीचे प्रोप्रायटर आहेत. तर चेतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. Shivaji Maharaj Statue Collapsed ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते पुतळ्याचे लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या आठ महिन्यांत हा पुतळा कोसळल्याने त्याची बांधणी निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे. या पुतळ्याला काही दिवसांपूर्वी गंज लागला होता. ही बाब लक्षात येताच सार्वजनिक बांधकाम खात्याने पत्र लिहून ही गोष्ट नौदलाला कळवली होती.
हेही वाचा:
सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द ; बीआरएस नेत्या के कविता यांना अखेर जामीन मंजूर





